जलपर्णी निर्मूलनाचे काम त्वरित पूर्ण करा
अंबाझरी तलावातील कामाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांचे निर्देश
Date : 12 Jun 2026
या पाहणीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त श्री. राजेश भगत, कार्यकारी अभियंता श्री. उज्वल लांजेवार मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोन स्वच्छता अधिकारी श्री. लोकेश बासनवार उपस्थित होते.
महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या निर्देशानुसार पर्यावरणासाठी घातक ठरलेल्या जलपर्णीच्या निर्मूलनाची मोहिम मनपाने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर जलपर्णीचे निर्मूलन केले जात आहे. पोकलेन, वीड हार्वेस्टरच्या सहाय्याने दररोज ४०० टन जलपर्णी काढली जात आहे.
या कामाची नियमित पाहणी आयुक्तांकडून केली जात आहे. जलपर्णीचे काढून टाकण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. ज्या भागात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर आहे. त्या जागेवर पोकलेन व वीड हार्वेस्टरचा वापर करून जलपर्णीचे प्रमाण कमी करावे, अशी सूचनाही आयुक्तांनी दिली.