स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूरसाठी पुढाकार घ्या, स्वच्छतेत सहकार्य करा
मनपाच्या स्वच्छता अभियानांतर्गत आमराई परिसराची विशेष स्वच्छता गेल्या ८ दिवसांत १,२५४ किलो कचरा संकलित
Date : 12 Jun 2026
नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत ५ जून ते १२ जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेत एकूण १ हजार २५४ किलो अर्थात १.२५ टन पेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात यश आले आहे. वृक्षित फाउंडेशनतर्फे दररोज येथे स्वच्छता केली जात असून, आतापर्यंत दैनंदिन कचरा संकलनानुसार ५ व ६ जून रोजी २८० किलो, ७ जून रोजी ३३५ किलो, ८ जून रोजी १०४ किलो, ९ जून रोजी ९६ किलो, १० जून रोजी ९३ किलो, ११ जून ९० किलो, १२ जून रोजी २५६ किलो, असे एकूण १,२५४ किलो कचरा संकलित करण्यात आला आहे. आमराई परिसराची ही स्वच्छता मोहीम पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून परिसराचे सौंदर्य अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यात वूक्षित संस्थेच्या ३२ स्वयंसेवकांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. तरी, शहरातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमराई परिसरासह संपूर्ण शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी आपल्या सहभागाची नोंद करावी. आपल्या योगदानानेच आपण एक स्वच्छ आणि सुंदर नागपूर घडवू शकतो, असे आवाहन मनपाद्वारे केले आहे.