नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. रविवार ७ जून ते १३ जून दरम्यान शोध पथकाने 332 प्रकरणांची नोंद करून 2,21,700 रुपयाचा दंड वसूल केला.सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 200 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 137 प्रकरणांची नोंद करून 54,800 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 43 प्रकरणाची नोंद करून 4,300 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 42 प्रकरणाची नोंद करून 16,800 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग-बोर्डिगचे हॉटेल, सिनेमाहॉल,मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 34,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप,कमान,स्टेज इत्यादी रचना करून अथवा वैयक्तिक कामाकरिता बंद करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 10,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 6,000 रुपयाची वसुली करण्यात आली. वैद्यकीय व्यवसायिकांनी बायोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 25,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 11,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 8 प्रकरणाची नोंद करून रू.40,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच इतर बांधकाम करतांना चेंबर क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 70 प्रकरणांची नोंद करून 13,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने विनापरवागी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. बायोमेडिकल वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकल्याने रू.25,000 चे दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 9 प्रकरणांतर्गत 45,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य साठवल्यामुळे 18 प्रकरणांतर्गत रू.1,80,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे 3 प्रकरणांतर्गत रू.15,000 चे दंड वसुल करण्यात आले. जुनी इमारत पाडताना काळजी न घेतल्यामुळे 2 प्रकरणांतर्गत रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे 15 प्रकरण अंतर्गत रू. 75,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच इतर बांधकाम करतांना चेंबर क्षतीग्रस्त करणे 1 प्रकरण अंतर्गत रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 50 प्रकरणांची नोंद करून रू.3,60,000 दंड वसुल केला.