मनपाच्या सर्व झोनमध्ये ‘रुग्णालय परिसर स्वच्छता’ अभियान उत्साहात
पर्यावरण संवर्धन पंधरवडा निमित्त मनपाचे विशेष अभियान
Date : 15 Jun 2026
मनपाच्या मा. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी आयसोलेशन रुग्णालयास भेट देऊन स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून नागपूर महानगरपालिका शहरातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये अशा प्रकारचे स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त श्री अंकित यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागातील रुग्णालयांची साफसफाई मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी तसेच घनकचरा कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
या अभियानाअंतर्गत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी झोनमधील सर्व आरोग्य केंद्रांच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी रुग्णालय परिसराची साफसफाई, घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट, कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या अभियानात मनपाच्या मा. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, नगरसेवक श्री सुहास नानवटकर, शिवसेना गट नेते श्री. गणेश चार्लेवार, नगरसेविका श्रीमती कांचन चौहान, श्रीमती. मंगला मस्के, सहाय्यक आयुक्त श्री. बावनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, आयसोलेशन रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. मेघा जैतवार, क्षयरोग तज्ञ डॉ. शिल्पा जिचकर,झोनल अधिकारी डॉ. ख्वाजा, मलेरिया फायलेरिया अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, डॉ.एम.एस.यू चे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. वीरेंद्र वानखेडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल वंदिले, , यूपीएचसी कॉटन मार्केटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराग मिश्रा तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. सचिन गाटे व इतर कर्मचारी उपस्थित होते. मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध झोनमधील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छ व निरोगी परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आज आर ए डब्ल्यू, जीव्हीपी पॉईंटची स्वच्छता
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि हरित स्वरूप देण्याच्या दिशेने पाऊल टाकत पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी (ता.16) मनपाच्या सर्व झोनमधील जीव्हीपी पॉईंट, आरएडब्ल्यू सोसायटी, मोहल्ला व निवासी परिसर अशा 114 ठिकाणाची साफसफाई अभियान व पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.