जीव्हीपी पॉईंट, आरएडब्ल्यू सोसायटी, मोहल्ला व निवासी परिसर झाले स्वच्छ
पर्यावरण संवर्धन पंधरवडानिमित्त मनपाचे विशेष अभियान
Date : 16 Jun 2026
नागपूर महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात 'विशेष स्वच्छता अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त श्री अंकित यांच्या निर्देशानुसार जीव्हीपी पॉईंट, आरएडब्ल्यू सोसायटी, मोहल्ला व निवासी परिसर अशा ११४ ठिकाणी मोहीम राबविण्यात आली. या सफाई अभियानात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
लक्ष्मीनगर झोनमधील इंडियन जिमखाना येथे राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता अभियानात नगरसेवक श्री. लखन येरावार, उपायुक्त श्री. राजेश भगत, सहाय्यक आयुक्त श्री. धनंजय जाधव, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल अधिकारी श्री. ऋषिकेश इंगळे, श्री. लोकेश बासनवार, ब्रँड अँबेसिडर व ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. कौस्तव चॅटर्जी, स्वयंसेवक कु. सुरभी जयस्वाल, कु. शीतल चौधरी, कु. श्रेया जोगे, सर्वश्री मेहुल कोसुरकर, विष्णूदेव यादव, कु, प्रिया यादव, श्री.पिनाकी बानिक, कु.प्रतीक इसमपेल्लीवार,श्री.तुषार देशमुख यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संपूर्ण परिसर सफाई करीत स्वच्छ केला. याशिवाय आशीनगर झोनमधील पाचपावली पोलिस क्वॉटर, जुनी ठवरे कॉलनी, विनोबा भावे नगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी झोनल स्वच्छता अधिकारी श्री. भोला खोब्रागडे, स्वच्छता निरीक्षक श्री. रोशन जांभुळकर यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर सफाई करीत स्वच्छ केला.
तसेच गांधी महाल झोनमधील इंदिरा गांधी भोसले कॉलनी, नेहरुनगर झोनमधील श्रीकृष्णनगर येथील निवासी परिसराची साफसफाई करून व पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले.
आज वारसा स्थळाची स्वच्छता अभियान
नागपूर महानगरपालिका द्वारा नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि हरित स्वरूप देण्याकरिता पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त नागपूरच्या गौरवशाली इतिहासाची ओळख असणाऱ्या विविध वारसा स्थळ परिसरात बुधवारी (ता.17) सकाळी 7.00 वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.