वैभवशाली इतिहासाच्या आठवणीना उजाळा मनपाद्वारे शहरातील वारसा स्थळांची साफसफाई
पर्यावरण संवर्धन पंधरवडा निमित्त मनपाचे विशेष अभियान
Date : 17 Jun 2026
नागपूर महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात 'विशेष स्वच्छता अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, विरोधी पक्षनेते श्री.संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त श्री अंकित यांच्या निर्देशानुसार नागपूरच्या वैभवशाली इतिहासाची ओळख असणाऱ्या विविध वारसा स्थळ परिसराची साफसफाई करण्यात आली. या सफाई अभियानात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
गांधी महाल झोन मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता अभियानात गांधी गेट, डीडी नगर विद्यालय, रुख्मिणी मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. सुरेश खरे यांच्यासह मनपाचे ब्रँड अँबेसिडर व ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. कौस्तव चॅटर्जी, कु. सुरभी जयस्वाल, कु. शीतल चौधरी, कु. श्रिया जोगे, कु. प्रिया यादव, सर्वश्री मेहुल कोसुरकर, विष्णूदेव यादव, पिनाकी बानिक, प्रतीक इसमपेल्लीवार, तुषार देशमुख यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संपूर्ण परिसर सफाई करीत स्वच्छ केला.
हनुमाननगर झोनमधील राम मंदिर चंदन नगर या वारसा स्थळ परिसराची साफसफाई करण्यात आली. तसेच पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी झोनल स्वच्छता अधिकारी श्री. दिनेश कलोडे, स्वच्छता निरीक्षक श्री. दुर्गेश बक्सरे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संपूर्ण परिसर सफाई करीत स्वच्छ केला.
याशिवाय धरमपेठ झोन मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता अभियानात गोवारी शहीद स्मारक, झिरो माईल चौक येथे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच नेहरुनगर झोनमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता अभियानात स्वामी नारायण मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. साफसफाई करण्यात आली. तसेच पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले.