मनपातर्फे महाराणा प्रतापसिंह यांना विनम्र अभिवादन
Date : 17 Jun 2026
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे आज (ता.17) विनम्र अभिवादन करण्यात आले.
Back To Home Page
मनपा मुख्यालयातील महापौर कक्षा समोरील दालनात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला उपायुक्त श्री. निर्भय जैन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, मनपाचे श्री.अमोल तपासे, श्री. प्रवीण वानखेडे, श्री. गजानन जाधव, श्री. बारई यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, एनडीएसचे जवान उपस्थित होते.