NEET 2026 परीक्षार्थींसाठी ‘आपली बस’ची मोफत विशेष बस सेवा
Date : 19 Jun 2026
विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रापर्यंतचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि तणावमुक्त व्हावा या उद्देशाने ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. NEET परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र (Admit Card) बसमधील वाहक (कंडक्टर) यांना दाखविल्यास त्यांना या विशेष वातानुकुलीत बस सेवेचा मोफत लाभ घेता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ व्हावे यासाठी NMC Chalo App च्या माध्यमातून बसचे थेट (Live) लोकेशन आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावेत यासाठी बहुसंख्य बस ह्रया सकाळी 10.00 वाजेपर्यंत सुटतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांवर दुपारी 12.30 वाजेपूर्वी पोहोचणे शक्य होईल. तसेच परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सायंकाळी 5.00 वाजल्यापासून विशेष बस सेवा उपलब्ध राहणार आहे.
‘आपली बस’ प्रशासन विद्यार्थ्यांना सुरक्षित, परवडणारी व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रवासाची चिंता न करता परीक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
‘आपली बस’तर्फे सर्व NEET परीक्षार्थ्यांना परीक्षेसाठी तसेच पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मा. सभापती, श्रीमती. मंगलाताई खेकरे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात!
प्रशासकीय अधिकारी
परिवहन विभाग, म.न.पा., नागपूर