ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी महानगरपालिकेचा पुढाकार
झीरो माईल स्मारक व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम
Date : 19 Jun 2026
-शिवानी दाणी वखरे
सभापती, स्थायी समिती, नागपूर महानगरपालिका " >
नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वाखाली सदर परिसराची स्वच्छता करण्यात आली. झीरो माईल शून्य मैल परिसर हा नागपूरच्या वैभवशाली इतिहासाचा आणि शहराच्या जागतिक ओळखीचा अविभाज्य भाग असल्याने त्याच्या स्वच्छतेसह सौंदर्य जपण्यास महापालिका कटिबद्ध आहे.
महानगरपालिकेकडून आगामी काळात या परिसरात नियमित स्वच्छता, हरित संवर्धन, देखभाल आणि सौंदर्यीकरणाची कामे सातत्याने करण्यात येणार असून, शहरातील सर्व ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळे स्वच्छ व आकर्षक ठेवण्यासाठी विशेष कृती आराखडाही राबविण्यात येणार आहे.
झीरो माईल(शून्य मैल) हे केवळ नागपूरचेच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या भूगोलातील एक महत्वाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक वारशाची स्वच्छता, देखभाल आणि संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नागपूर महानगरपालिका शहरातील प्रत्येक वारसा स्थळ स्वच्छ, सुशोभित आणि नागरिक व पर्यटकांसाठी प्रेरणादायी ठेवण्यास कटिबद्ध असून, यासाठी सातत्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात येतील."
-शिवानी दाणी वखरे
सभापती, स्थायी समिती, नागपूर महानगरपालिका