सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 24 Jun 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. यश इन्फ्रा व्हेंचर यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. सुजन सावजी यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. द रमण कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. श्री रेणुका अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मजुमदार बॅनर्जी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. स्वामी बिलगाव बिल्डर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. विघ्नकर्ता मेडीसीन्स सप्लायर्स यांनी खुल्या भुखंडावर बायोमेडीकल कचरा टाकल्यामुळे रू. 25,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत दिपक कोटवानी यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अशोक किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. स्काय अपार्टमेंट यांनी
मनपाच्या चेंबरवर बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. साईकृपा अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू. 1,00,000 दंड वसुल केला.