नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारला
स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे सादर करणार
Date : 25 Jun 2026
नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-27 या वर्षासाठीचा प्रस्तावित अर्थसंकल्प येत्या शनिवार ता. 27 रोजी मनपाच्या विशेष सभेत सादर होणार आहे. स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे हा अर्थसंकल्प सभेत मांडणार आहेत.
Back To Home Page
निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या 19 मे रोजी स्थगित झालेली मनपाची विशेष सभा कविवर्य सुरेश भट सभागृहात येत्या 27 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर श्रीमती निता ठाकरे राहतील. सन 2025-26 चा सुधारित अर्थसंकल्प व 2026-27 चा प्रस्तावित अर्थसंकल्प श्रीमती शिवानी दाणी-वखरे मांडणार आहेत.