सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 39 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 25 Jun 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. यश इन्फ्राव्हेंचर यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. अठलानी पिनॅकल यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. मे. अनिल विश्वकर्मा यांनी बांधकामामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. एसएसडब्ल्यु एलएलपी लि.यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. मे. टु जोज् यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत हिमांशु शाहु यांनी लॉनचे घाण पाणी रस्त्यावर सोडल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. लिवीयानो 19 यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. स्वामी किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत आशीष जयस्वाल यांनी चेंबरवर गाडी पार्क केल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. श्याम मनवारी यांनी जुनी इमारत पाडताना चेंबर क्षतीग्रस्त झाल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हॉटेल रिलॅक्स इन यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू.65,000 दंड वसुल केला.