मनपा आयुक्त डॉ.विपीन यांनी घेतला ताजबाग उर्सच्या कामाचा आढावा
Date : 30 Jun 2026
ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत नगरसेविका श्रीमती वर्षा डोंगरे, श्रीमती तसनीम परबीन नियामत खाने ताजी, पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिका राव एन, मनपाचे उपायुक्त श्री राजेश भगत, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री तुषार बारहाते, सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, श्री. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव श्री. ताज अहमद(राजा) यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी उर्स दरम्यान स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले, परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, परिसरात विद्युत व्यवस्था सुनिश्चित करावी, उर्स दरम्यान लागणाऱ्या मेळाव्यातील पाळणा, झुला आदींचे सेफ्टी ऑडीत करावे, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी, कचरा संकलनासाठी आवश्यक ती सोय करण्याचे निर्देश आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय मनपाच्या नेहरुनगर झोन क्र. ५ कार्यक्षेत्रातील हजरत बाबा ताजुद्दीन दरगाह ताजबाद येथे येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता रस्त्यावर असणाऱ्या अतिक्रमित भागातून लवकरात लवकर अतिक्रमण हटविण्यात यावे असे निर्देश ही आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.