नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार (ता.30)शोध पथकाने 43 प्रकरणांची नोंद करून 44,000 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विसर्जन करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.100 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 800 रूपयाची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस अश्या संस्थानी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ व मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून रू. 25,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच इतर बांधकाम करतांना क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. प्रोटीन बॉक्स, मे. आर्यन बार अँड रेस्टॉरेंट व मे. हॉटेल तंजोर यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू. 15,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. महालक्ष्मी ट्रेडर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. ग्रॅनीज् हॉट चिक यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. आर्शिवाद फॅमिली रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. शिव शंकर कांच भंडार यांनी नजीकच्या ड्रेनेज मध्ये काचाचे तुकडे टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. मॉडर्न इरा यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.40,000 दंड वसुल केला.