ऐतिहासिक आमराई स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी पुढाकार
स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी केली पाहणी
Date : 01 Jul 2026
सहकारनगरजवळून नागपूर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे ऐतिहासिक आमराई वनक्षेत्र आहे. या भागात सकाळ व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या बरीच असते तसेच विमानतळावर ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. आमराई नावाने प्रसिद्ध असलेली ही जागा भोसलेकालिन असून या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे.
हे वनक्षेत्र सुरक्षित राहण्यासाठी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी पाहणी केली व स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी विविध सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी लक्ष्मी नगर झोनच्या सभापती श्रीमती लक्ष्मी यादव, नगरसेवक श्री. अमोल शामकुळे, नगरसेवक श्री. ईश्वर ढेंगळे, सहाय्यक आयुक्त श्री. धनंजय जाधव, कार्यकारी अभियंता श्री. रविंद्र बुंधाडे, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी श्री. सूर्यशंकर साहू व श्री. देशमुख, श्री. आशीष नाईक, श्री. श्रीकांत भोरे, श्री. विनोद चावला, वृक्षित फाऊडेशनचे श्री. लोकेश थोटा, यश सरपोतदार उपस्थित होते.
हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वृक्शित फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी आमराई भागात मोहिम राबविली. यात श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी भाग घेतला होता. यातून ९ टन कचरा जमा केला होता. या भागातून फिरणार्य३ंची तसेच वािमानतळावर येजा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने रात्री पथदिवे सुरू ठेवावे तसेच दिव्यांचा प्रकाशासाठी अडथळा निर्माण करणार्या झाडांच्या फांद्या तोडाव्या, हा रस्ता काही ठिकाणी खराब झाल्याने डागडुजी करण्यात यावी, या भागात एमएडीसीने पेट्रोलिंगसाठी मनुष्यबळ वाढवावे, या भागात नागरिक कचरा फेकणार नाही, यासाठी काळजी घेण्यासाठी सुरक्शा रक्शकांची संख्या वाढवावी, तसेच या भागात वस्ती नसल्याने दिशादर्शक फलक (साईनबोर्ड) लावण्यात यावे, अशा सूचना श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी केल्या.