पेन्शन घोटाळा संदर्भात प्रसिद्ध बातमीचा खुलासा
Date : 02 Jul 2026
तद्नंतर शासन निर्णय नगर विकास विभाग दिनांक २२/०२/२०२२ नुसार सप्टेंबर २०२४ मध्ये तत्कालीन मा. आयुक्त यांचेकडे मनपा हिस्सा १० टक्के वरुन १४ टक्के करण्याबाबत नस्ती पुनश्च सादर केली असता, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावर सादर करावे. तोपर्यंत १० टक्के अंशदान सुरु ठेवावे असे मा. आयुक्त यांनी निर्देशित केले.
वरील प्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावर पुनश्च नस्ती सादर करण्यांत आली असता मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार करुन तत्कालीन मा. आयुक्त/ प्रशासक यांनी ठराव क्रमांक ८२/ मनपा/ प्रशासक, दिनांक ०६/१२/२०२५ नुसार मनपाचा (सहभाग) अंशदान दि. ०१/०४/२०२५ पासून १० टक्के वरुन १४ टक्के करण्याबाबत मंजूरी प्रदान केली त्यानुसार सद्यास्थितीत कार्यवाही सुरु आहे.
उपरोक्तपणे मनपाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन निर्णय घेण्यात आलेला असून, यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक घोटाळा झालेला नाही. तरी याद्वारे वरीलप्रमाणे प्रसिद्ध झालेल्या चुकीच्या बातमीचे खंडन करण्यात येत आहे.
(सदाशिव शेळके)
प्रमुख लेखा व वित्त अधिकारी
महानगरपालिका, नागपूर