प्रभाग ३० मध्ये घटनेची राज्य पीडब्ल्यूडी विभागाद्वारे सखोल चौकशी
Date : 02 Jul 2026
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात मनपाच्या प्रभाग क्र.३० मधील गौसिया कॉलनीतील बिसा बाबा दरगाहच्या जवळ पाण्यात विद्युत प्रवाह आल्याने एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य शासनाच्या अखत्यारीतील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विद्युक्त विभाग(इलेक्ट्रीक विंग) च्या चौकशी झाल्यानंतर एमएसईबी (महावितरण) कडून काम करण्यात येईल. अशी माहिती मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये यांनी दिली.
Back To Home Page