सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मनपाचे केले वाहन परत
Date : 02 Jul 2026
नागपूर महानगरपालिकेच्या सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर यांनी मनपाद्वारे कार्यालयीन कामा प्राप्त झालेली स्कारपीओ गाडी नं. MH- 491401 वाहन मनपाला परत केले आहे.
Back To Home Page
मनपा सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर हे गुरुवारी सकाळी आपल्या घरून सिव्हील लाईन्स स्थित मनपा मुख्यालयात आपल्या कार्यलयात आले, त्यांनी घरी परत जाताना सायंकाळी मनपाद्वारे प्राप्त वाहन मनपाला परत केले. आता श्री बोरकर हे स्वतः च्या व्यक्तिगत वाहनातून मनपा मुख्यालय येथे येणार आहेत.