स्थायी समिती सभापती यांनी केली 'वॉकेबल स्ट्रीट'ची पाहणी, “व्हीएनआयटी ते काचीपुरा चौक” दरम्यानच्या कामाचा घेतला आढावा
अतिक्रमण हटवण्यासह आणि दुकानांसाठी वेंडर पॉलिसी तयार करण्याचे दिले निर्देश
Date : 03 Jul 2026
यापाहणी दरम्यान लक्ष्मीनगर झोनच्या सभापती श्रीमती तारा (लक्ष्मी) यादव, नगरसेविका श्रीमती वर्षा चौधरी, मनपा उपायुक्त श्री. मंगेश खवले, सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, कार्यकारी अभियंता श्री रवींद्र बुंधाडे, उपअभियंता श्री.आनंद मोखाडे आणि झोनल स्वच्छता अधिकारी श्री. लोकेश बासनवार यांच्यासह मनपाचे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी वॉकेबल स्ट्रीटच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला, काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटी लक्षात घेऊन कामात आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना चालताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या संपूर्ण मार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय, वॉकेबल स्ट्रीटवरील दुकाने लीजवर देण्याकरिता योग्य ती 'वेंडर पॉलिसी' लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश ही त्यांनी स्थावर विभागाचे उपायुक्त श्री. मंगेश खवले यांना दिले.