मनपा इमारतीतील रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणालीचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ
आयुक्तांच्या उपस्थितीत लकडगंज झोन इमारतीत प्रणाली कार्यान्वित
Date : 06 Jul 2026
लकडगंज झोन इमारतीच्या प्रांगणात आयोजित समारंभात सत्तापक्ष नेता श्री.नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक तथा एनआयटी विश्वस्त श्री.शेषराव गोतमारे, झोन सभापती श्रीमती महेश्वरी बिसेन, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती श्रीमती मनीषा अतकरे, कर आकारणी समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, नगरसेवक श्री.अरुण हरोडे, श्री. प्रदीप पोहणे, श्री. रामदास शाहू, नगरसेविका श्रीमती शीतल रारोकर, श्रीमती निरंजना पाटील, कु.दुर्गेश्वरी कोसेकर, झोनचे सहायक आयुक्त श्री. विजय थूल, कार्यकारी अभियंता श्री. सचिन रक्षमवार, सीपीएस एन्व्हायरो टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,नागपूरचे श्री. प्रभात धाडीवाल, श्री.ज्ञानचंद बोहरा, श्री.आकाश बोहरा यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाच्या 75 इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली तयार केली जात आहे. या अंतर्गत लकडगंज झोन कार्यालयाच्या इमारतीमध्ये सेंट्रल ग्राऊंड वॉटर ॲथोरिटी बोर्ड आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेले विविध क्षमतेचे ४ रेन फिल्टर सीपीएस एन्वायरो टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नागपूरच्या मदतीने लावण्यात आले आहेत. याद्वारे प्रत्येक पावसाळी हंगामात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी फिल्टर होऊन जवळपास 3 लाख लिटर पाणी झोनमधील विहिरीत जमा होणार असून, यामुळे पाण्याची मोठी बचत होणार आहे. याप्रसंगी महापौर श्रीमती निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी शहरात जनजागृती करणाऱ्या 'रेन वॉटर हार्वेस्टिंग डेमो' वाहनाचीही पाहणी केली.
भूजल पातळीत वाढीसाठी होणार मदत-महापौर श्रीमती निता ठाकरे
शहरात पाणीटंचाई भासू नये आणि भूजल पातळीत वाढ व्हावी यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, दह्ही झोन मधील शासकीय इमारती, मनपाच्या शाळा, झोन कार्यालय, इतर सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच शहरातील इतर मोठ्या इमारतींनीही ही प्रणाली राबवावी, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले. मनपातर्फे प्रत्येक झोनमधील मनपाच्या शाळा, ग्रंथालये, दवाखाने, झोन कार्यालये, उद्याने, खेळाची मैदाने, स्टेडियममध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करून पावसाचे पाणी विहीर किंवा बोअरवेलमध्ये झिरपेल, याची काळजी घेतली जाईल. यामुळे शहरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.