महापौर निता ठाकरे यांनी केली ताजबाग उर्सच्या कामातील मनपाच्या सोयीसुविधेचे पाहणी
Date : 06 Jul 2026
ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे, ज्येष्ठ नगरसेवक श्री. विजय( पिंटू) झलके,
नगरसेविका श्रीमती तसनीम परबीन नियामत खाने ताजी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव श्री. ताज अहमद(राजा) यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी उर्स दरम्यान मनपाद्वारे केल्या जाणारी स्वच्छता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले, परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यावर भर दिला. येथे येणाऱ्या भाविकांना नागरी सुविधा उपलब्ध होण्याकरिता आवश्यक ती सर्व सोय करण्याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले.
याशिवाय मनपाच्या नेहरुनगर झोन क्र. ५ कार्यक्षेत्रातील हजरत बाबा ताजुद्दीन दरगाह ताजबाद येथे येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता रस्त्यावर असणारे अतिक्रमण मनपाच्या प्रवर्तन विभागाद्वारे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.