महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केली फ्रेंड्स कॉलनी येथील नाल्याची पाहणी
Date : 07 Jul 2026
याप्रसंगी क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, नगरसेविका श्रीमती साधना बरडे, नगरसेवक श्री विक्रम ग्वालबंशी, मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात साचपाण्याची समस्या निर्माण होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचा आढावा महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला.
फ्रेंड्स कॉलनी परिसरातील स्थानिक नागरिकांनी नाल्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे महापौरांचे लक्ष वेधले होते. पावसाळ्यात नाल्यातील कचरा आणि अडथळ्यांमुळे पाणी तुंबून परिसरातील घरांत शिरण्याचा धोका असतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली होती. या विनंतीला त्वरित प्रतिसाद देत महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान नाल्याची सद्यस्थिती आणि त्यातील अडथळे समजून घेतल्यानंतर महापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नाल्याच्या संदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.