सफाई कर्मचाऱ्यांसाठी च्या सदनिकांचे “महर्षि सुदर्शन वाल्मिकी वसाहत” असे नामकरण
उपमहापौर यांच्या अध्यक्षतेत व सत्तापक्ष नेते यांच्या उपस्थितीतील बैठकित निर्णय
Date : 07 Jul 2026
मौजा नारी येथे सफाई कर्मचारी यांच्याकरिता ३९२ इडब्ल्यूएस सी सदनिका प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्यासह सर्व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार १२ जुलै रोजी होणार आहे. त्याअनुषगाने उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांच्या अध्यक्षतेखाली वाल्मिकी समाज बांधवांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुधीर(बंडू) राऊत, नगरसेवक श्री. विजय होले, नगरसेवक श्री. रितेश गावंडे, मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सदनिकांच्या नावाबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.