महापौरांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी
Date : 08 Jul 2026
नागपूर महानगरपालिकाद्वारे नारी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 518 ईडब्ल्यूएस सदनिका व सफाई कर्मचारी यांच्याकरिता 392 ईडब्ल्यूएस सदनिका प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रम स्थळाची महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या.
Back To Home Page
याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, आयुक्त डॉ. विपीन, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता श्री. सुनील ऊईके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.