मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या उपस्थितीत “महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत” आणि पीएमएवाय ‘स्वप्नपूर्ती’ चे भूमीपूजन
Date : 11 Jul 2026
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, वित्त, नियोजन कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राज्याचे सफाई कर्मचारी आयोग, (राज्यमंत्री दर्जा) अध्यक्ष मा.श्री. शेरसिंह (सतीश) डागोर उपस्थित राहतील. याशिवाय भूमीपूजन सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यसभा सदस्य मा. श्रीमती माया ईवनाते, लोकसभा सदस्य श्री. श्यामकुमार बर्वे, विधान परिषद सदस्य सर्वश्री सुधाकर अडबाले, प्रा. संजय भेंडे, डॉ. परिणय फुके, अभिजीत वंजारी, कृपाल तुमाने, डॉ. राजीव पोतदार, अरुण लखानी तसेच विधानसभा सदस्य सर्वश्री डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, मोहन मते, प्रविण दटके उपस्थित राहतील.
याशिवाय महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि 'प्रधानमंत्री आवास योजना २.०' अंतर्गत ‘स्वप्नपूर्ती’ भूमीपूजन सोहळ्यात विशेष मान्यवर म्हणून उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी- वखरे, सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, वैद्यकिय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, दुर्बल घटक समिती सभापती कु. लक्ष्मी हत्तीठेले, आशीनगर झोन सभापती श्री. आसिफ शेख, एआयएमआयएम गटनेता श्री. शकील पटेल, मुस्लीम लिग गटनेता श्री. असलम खान मुल्ला, शिवसेना (उबाठा) गटनेते श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप) गटनेता श्रीमती आभा पांडे, बहुजन समाज पार्टी गटनेता श्रीमती हर्षला जैस्वाल, शिवसेना गटनेता श्री. गणेश चर्लेवार, नगरसेविका श्रीमती भावना लोणारे, नगरसेवक श्री. दिनेश यादव, नगरसेविका श्रीमती संगिता पाटील, नगरसेवक श्री. मनीष बनसोड, नागपुर सुधार प्रन्यास सभापती श्री. संजय मीणा, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जिल्हाधिकारी श्री.कुमार आशीर्वाद, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम., श्री. मिलिंद मेश्राम उपस्थित राहतील.
कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने मनपा अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये आणि अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार यांनी केले आहे.