स्वच्छता दूतांसाठीच्या “महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहत” आणि पीएमएवाय ‘स्वप्नपूर्ती’ चे भूमिपूजन
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते
Date : 12 Jul 2026
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आणि नागपूर महानगरपालिकाचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, या संकुलामुळे स्वच्छता कर्मचारी आणि बेघर नागरिकांसाठी आपला हक्क घर मिळणार आहे. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पदार्पण करीत स्वयंरोजगार करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, या क्षेत्रात स्वयं रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल. त्यांनी स्वच्छता कामगारांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. स्वच्छता कामगारांचे जीवन समृद्ध करण्यासाठी महापौर यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि गरीब नागरिकांना मालकीहक्काचे पट्टे दिल्याबद्दल ही मुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दोन्ही प्रकल्पांची माहिती दिली. तसेच या वसाहतींना मुख्यमार्गशी जोडण्यासाठी रस्ता तयार करण्याची व सर्व सहाही मतदार संघात गरजू नागरिक व स्वच्छता दूतांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी अशी मागणी केली. तसेच या योजनांसाठी मिळालेल्या उत्तम सहकार्याबद्दल राज्य शासन व मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे आभार मानले.
तर उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी महाराष्ट्र शासनाचे आणि मनपाचे आभार मानत सर्व विधानसभा क्षेत्रात सफाई कामगारांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी विनंती केली. तसेच ऐवजदार यांच्यासाठीची २० वर्षांची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी केली. राज्य सफाई कामगार आयोगचे अध्यक्ष श्री. सतीश डागोर यांनी सांगितले की या ऐतिहासिक दिवसाची नोंद स्वच्छता कामगारांसाठी इतिहासात केली जाईल. त्यांना हक्काचे घर देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि महापौरांचे आभार मानले. तसेच येत्या २२ जुलैला सेवा गौरव दिवस साजरा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ‘महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहत’च्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले, तसेच 'प्रधानमंत्री आवास योजना २.०' अंतर्गत ईडब्ल्यूएस सदनिका ‘स्वप्नपूर्ती’ प्रकल्पाचा भूमिपूजन करीत कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महर्षी बाल्मिकी सुदर्शन समाज व उत्तर नागपूरच्या नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व उपस्थित इतर मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ‘महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहत’ आणि 'प्रधानमंत्री आवास योजना २.०' अंतर्गत ईडब्ल्यूएस सदनिका ‘स्वप्नपूर्ती’ प्रकल्पाचे माहिती पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफितीचे सादरीकरण कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आसावरी गलांडे यांनी तर आभार मनपाचे सत्तापक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी अभार व्यक्त करीत लवकरच पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्याचा कार्यक्रम मनपात आयोजित केला जाणार असल्याचे सांगितले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मौजा नारी येथे साकारण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहतीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी एकूण १४ इमारतींमध्ये दोन बीएचकेच्या तब्बल ३९२ सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी परवडणाऱ्या किमतीत एक आणि दोन बीचएकेच्या एकूण ५१८ सदनिका उभारल्या जाणार आहेत. तीन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे " >
कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा.ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, वित्त, नियोजन कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राज्याचे सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष मा.श्री. शेरसिंह (सतीश) डागोर, आमदार श्री. प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी- वखरे, मनपाचे सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, माजी आमदार श्री.भोला बढेल, डॉ. मिलिंद माने, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, वैद्यकिय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, आशीनगर झोन सभापती श्री. आसिफ शेख, मुस्लीम लिग गटनेता श्री. असलम खान मुल्ला, नगरसेवक श्री. विक्की कुकरेजा, नगरसेवक श्री. महेंद्र धनविजय, नगरसेविका श्रीमती सुषमा चौधरी, श्रीमती प्रमिला मथराणी, नगरसेवक श्री. सुधीर (बंडु) राऊत, नगरसेविका श्रीमती भावना लोणारे, नगरसेवक श्री. दिनेश यादव, नगरसेविका श्रीमती संगिता पाटील, नगरसेवक श्री. मनीष बनसोड, नगरसेवक श्री. मनोज साबळे नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम., श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता श्री. सुनील उईके, उपायुक्त श्री. गणेश राठोड, एसडीपीएलचे संचालक व प्रकल्प विकासक श्री. गौरव अग्रवाल, यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी –कर्मचारी, माजी उपमहापौर श्री. संदीप जाधव, माजी नगरसवेक श्री. मनोज सांगोळे, महर्षी सुदर्शन बाल्मिकी समाजाचे श्री. दिलीप हाथीबेड, श्री. अजय हाथीबेड, श्री. मोतीलाल जनवारे, श्री. जयसिंग कचवा, श्री. शशी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील सर्व पात्र सफाई कर्मचाऱ्यांना श्रमसाफल्य योजनेअंतर्गत 300 चौरस फुटांचे मोफत घर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय कायम ठेवण्यात आला असल्याचे सांगत त्यांनी मनपाद्वारे उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाला "महर्षी सुदर्शन बाल्मीकी वसाहत" असे नाव देण्यात येणार असल्याचे सांगितले. या वसाहतीत उद्यान, सामुदायिक सभागृह, सौरऊर्जा प्रणाली, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, पाणीपुरवठा व इतर आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून आदर्श वसाहत उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य व निवास या चारही क्षेत्रांत राज्य शासन सातत्याने काम करीत आहे. नागपूर महानगरपालिकेत लवकरच मोठ्या प्रमाणावर लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार ५०० पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या काळात नागपुरच्या सर्वच विधान सभा क्षेत्रात अशा प्रकारची आवास योजना तयार करण्यात येईल, अशा योजनेतून सफाई कर्मचाऱ्यांना घर देण्याची मा.प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्न पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आणि नागपूर महानगरपालिकाचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, या संकुलामुळे स्वच्छता कर्मचारी आणि बेघर नागरिकांसाठी आपला हक्क घर मिळणार आहे. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पदार्पण करीत स्वयंरोजगार करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, या क्षेत्रात स्वयं रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल. त्यांनी स्वच्छता कामगारांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. स्वच्छता कामगारांचे जीवन समृद्ध करण्यासाठी महापौर यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि गरीब नागरिकांना मालकीहक्काचे पट्टे दिल्याबद्दल ही मुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दोन्ही प्रकल्पांची माहिती दिली. तसेच या वसाहतींना मुख्यमार्गशी जोडण्यासाठी रस्ता तयार करण्याची व सर्व सहाही मतदार संघात गरजू नागरिक व स्वच्छता दूतांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी अशी मागणी केली. तसेच या योजनांसाठी मिळालेल्या उत्तम सहकार्याबद्दल राज्य शासन व मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे आभार मानले.
तर उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी महाराष्ट्र शासनाचे आणि मनपाचे आभार मानत सर्व विधानसभा क्षेत्रात सफाई कामगारांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी विनंती केली. तसेच ऐवजदार यांच्यासाठीची २० वर्षांची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी केली. राज्य सफाई कामगार आयोगचे अध्यक्ष श्री. सतीश डागोर यांनी सांगितले की या ऐतिहासिक दिवसाची नोंद स्वच्छता कामगारांसाठी इतिहासात केली जाईल. त्यांना हक्काचे घर देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि महापौरांचे आभार मानले. तसेच येत्या २२ जुलैला सेवा गौरव दिवस साजरा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ‘महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहत’च्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले, तसेच 'प्रधानमंत्री आवास योजना २.०' अंतर्गत ईडब्ल्यूएस सदनिका ‘स्वप्नपूर्ती’ प्रकल्पाचा भूमिपूजन करीत कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महर्षी बाल्मिकी सुदर्शन समाज व उत्तर नागपूरच्या नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व उपस्थित इतर मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ‘महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहत’ आणि 'प्रधानमंत्री आवास योजना २.०' अंतर्गत ईडब्ल्यूएस सदनिका ‘स्वप्नपूर्ती’ प्रकल्पाचे माहिती पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफितीचे सादरीकरण कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आसावरी गलांडे यांनी तर आभार मनपाचे सत्तापक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी अभार व्यक्त करीत लवकरच पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्याचा कार्यक्रम मनपात आयोजित केला जाणार असल्याचे सांगितले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मौजा नारी येथे साकारण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहतीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी एकूण १४ इमारतींमध्ये दोन बीएचकेच्या तब्बल ३९२ सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी परवडणाऱ्या किमतीत एक आणि दोन बीचएकेच्या एकूण ५१८ सदनिका उभारल्या जाणार आहेत. तीन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे