पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड ; आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक
Date : 16 Jul 2026
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेता श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, नागपूर सुधार प्रन्यास सभापती श्री. संजय मीना, मनपा आयुक्त डॉ विपीन, जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी आणि इतर उपस्थित राहणार आहे. या सभेत नागपूर, बुटीबोरी, हिंगणा, आणि इतर औद्योगिक वसाहतीचे प्रमुख उद्योजक, नागपुरातील प्रमुख शाळेतील विश्वस्त (ट्रस्टी), डॉक्टर, कंत्राटदार संगठनचे प्रतिनिधी आणि विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित राहणार आहे. नागपूर महानगरपालिकातर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येत या कार्यक्रमात उपस्थित राहावे. तसेच ज्या संस्थेला वृक्ष लागवडीसाठी मनपाला वृक्ष द्यायचे आहे, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हावे.