खोदकाम करण्यापूर्वी मनपाची परवानगी आवश्यक: आयुक्त डॉ. विपीन
Date : 17 Jul 2026
बैठकीत महावितरणचे मुख्य अभियंता, महाजेनकोचे मुख्य अभियंता, मनपाच्या अधीक्षक अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, श्री. मनोज तालेवार, मनपा नगर रचना विभागाचे श्री. ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुपारे, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएलसह इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकातर्फे नाग नदी पुनर्जीवन प्रकल्प, अमृत योजना आणि इतर ठिकाणी कामे सुरू आहे. तसेच विविध शासकीय विभाग सुद्धा नागपुरात कामे करीत आहे. बरेच ठिकाणी असे आढळले आहे की, विकास कामे करतांना रस्त्याच्या खाली युटिलिटी (आवश्यक सेवा) जसे पाईप लाईन, विद्युत केबल, टेलेफोन केबल, आणि इतर बाबी असतात. खोदकामामुळे या सुविधा विस्कळीत होतात आणि त्याचा परिणाम नागरिकांवर होतो. मनपा आयुक्तांनी सर्व विभागांना त्यांच्यामार्फत टाकण्यात आलेल्या केबल लाईनच्या जीपीएस मॅप देण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतेही खोदकाम करण्यापूर्वी मनपाकडून परवानगी घेण्याचे ही आदेश दिले. त्यांनी सांगितले की, ज्या विभागांनी पूर्व परवानगी घेतली नाही तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.