मनपाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट व छत्रीचे मोफत वितरण
मनपा व रोटरी क्लब ईशान्यचा संयुक्त उपक्रम
Date : 18 Jul 2026
नागपूर महानगरपालिका व रोटरी क्लब ईशान्यच्या संयुक्त विद्यमाने हा अमृतछाया अभियान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित केला होता. यावेळी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, नेहरुनगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, उपसभापती श्रीमती भारती बुंदे, नगरसेविका वैशाली उदापूकर, नगरसेविका श्रीमती वर्षा डोंगरे, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना महाजन, रोटरी क्लबचे श्री. निलेश राठी, श्री. धीरज साबू उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीची शिकवण - महापौर ठाकरे
यावेळी बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी मानून या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा जाणीव ठेऊन परीक्षांमध्ये यश संपादन करावे, असे आवाहन केले व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची शिकवण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व नागपूरचे आमदार श्री कृष्णा खोपडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्यासाठी आवाहन केले. त्यांनी सांगितले की, दहावीच्या विद्यार्थ्यांनी काळजी पूर्वक शिक्षणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी शिक्षण समिती सभापती श्रीमती संतोष देवी लढ्ढा यांचे मनपा शाळेत अभिनव उपक्रम आयोजित करण्यासाठी अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना रेनकोट आणि छत्री वितरण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ईशान्य यांचे आभार मानले.
शिक्षण समिती सभापती श्रीमती संतोष देवी लढ्ढा यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महिला शिक्षणाची प्रेरणा श्रीमती सावित्री बाई फुले यांच्या महिला शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आजच्या काळात मुलांनी संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे. यातून चांगल्या चरित्राचे निर्माण होते. त्यांनी रोटरी क्लब ऑफ ईशान्य चे विद्यार्थ्यांना रेनकोट आणि छत्री वितरण करण्यासाठी आभार मानले. रोटरी क्लब ऑफ ईशान्य चे अध्यक्ष श्री निलेश राठी यांनी आपल्या भाषणात सामाजिक बांधिलकीतून मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट आणि छत्री चे वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रमांचे संचालन श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले.
आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना महाजन यांनी केले. या प्रसंगी शिक्षण विभागाचे श्री सुभाष उपासे, श्री. प्रशांत टेंभुर्णे, श्री. विनय बगळे यांच्यासह इतर उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर करियर सल्लागार श्रीमती प्रणाली सरोदे यांनी मुलांना दहावी नंतर काय करायचे याचे उत्तम मार्गदर्शन केले.