आपली बसची भिलगाव–मोरभवन दरम्यान नवीन मार्ग क्र. १६३ सेवा सुरू
Date : 20 Jul 2026
ही बससेवा दररोज सकाळी ६:३० ते सायंकाळी ६:४५ या वेळेत प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध राहणार आहे. या नवीन मार्गामुळे भिलगाव परिसरातील नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागाशी अधिक चांगली चांगला संपर्क प्रस्थापित होणार आहे.
या बससेवेचा शुभारंभ परिवहन समितीच्या सभापती मा. श्रीमती मंगला खेकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपली बस कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते:
डॉ. राजूजी मिश्रा – राष्ट्रीय महासचिव, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान
श्री भास्करजी भनारे – अध्यक्ष, भाजपा भिलगाव शहर
नवीन मार्ग क्र. १६३ मुळे भिलगाव व परिसरातील नागरिकांना काम, शिक्षण, आरोग्य सेवा तसेच दैनंदिन प्रवासासाठी अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
नागरिकांच्या गरजेनुसार बससेवा अधिक प्रभावी आणि सुलभ करण्यासाठी तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आपली बस सातत्याने प्रयत्नशील आहे.