सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 291 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 20 Jul 2026
सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विसर्जन करणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून 3,500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 79 प्रकरणांची नोंद करून 31,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 14 प्रकरणाची नोंद करून 1400 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 23 प्रकरणाची नोंद करून 9200 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 25 प्रकरणाची नोंद करून 50,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप,कमान,स्टेज इत्यादी रचना करून अथवा वैयक्तिक कामाकरिता बंद करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 10,000 रुपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/ जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 10,00 रुपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 5,000 चे दंड वसुल करण्यात आले. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ व मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 12प्रकरणाची नोंद करून 12,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 16,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 14 प्रकरणाची नोंद करून 70,000 चे दंड वसुल करण्यात आले. लग्न समारंभचे हॉल, सभागृह, कॅटरींग व हॉटेल व्यवसायीक यांनी उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 104 प्रकरणांची नोंद करून 20,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने बॅनर
उपद्रव शोध पथकाने विनापरवानगी फलक लावल्यामुळे 2 प्रकरणाची नोंद करून रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल15 प्रकरणाची नोंद करून रू.75,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य साठवल्यामुळे 23 प्रकरणांची नोंद करून रू.2,30000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे 5 प्रकरणाची नोंद करून रू.25,000 दंड वसुल करण्यात आले. ध्वनी प्रदूषण पसरवल्याबद्दल 4 प्रकरणाची नोंद करून रू.20,000 दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 24 प्रकरणाची नोंद करून 1,20000 चे दंड वसुल करण्यात आले. लग्न समारंभाचे हॉल, सभागृह,कॅटरींग व हॉटेल व्यवसायिक यांनी उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 10,000 रूपयाची वसुली करण्यात आली. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच इतर बांधकाम करतांना क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 15,000 दंड वसुल करण्यात आले. खाजगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमधील तसेच व्यावसायिक ठिकाणांवरील उरलेले अन्नपदार्थ सार्वजनिक ठिकाणी टाकणे/फेकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 78 प्रकरणांची नोंद करून रू.5,100000 दंड वसुल केला.