नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता.22)शोध पथकाने 49 प्रकरणांची नोंद करून 47,200 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7,200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 8 प्रकरणाची नोंद करून 800 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 1,600 रूपयाची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून रू.20,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर नसणे, चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच बांधकाम करतांना नाली क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 1,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. जलाराम इंटरप्रायझेस व मे. मैफिल कॅफे यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. हिमालय बिल्डर्स यांनी पोकलँडने चेंबर तोडल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. धनराज बजाज अँड कंपनी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. स्वामी रेसीडेंसी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. मे. अमन असोसिएटस् यांनी रस्त्यालगत 5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. ओम शक्ती फॅमिली रेस्टॉरेंट व मे. हॉटेल न्यु आनंद फरसाण यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. शिव किराणा स्टोर व मे. मॉडर्न किराणा स्टोर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत कृष्णा किरणा स्टोर वर प्रतिबंधात्मक प्लास्टिक चा वापर केल्या प्रकरणी ५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला.
मंगळवारी झोन अंतर्गत मे. हनी बनी एक्झीबीशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. मन्नत अँड युनीक शुज सेंटर यांनी तात्पुर्ती फुटपाथवर दुकान लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. के.जी.एन हॉटेल यांनी हॉटेलमध्ये डिसेलटिंग चेंबर नसल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल आले. उपद्रव शोध पथकाने 14 प्रकरणांची नोंद करून रू.80,000 दंड वसुल केला.