मनपाद्वारे लोकमान्य टिळक अन् थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन
Date : 23 Jul 2026
मनपाच्या मुख्यालयातील महापौर कक्षासमोर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दोघांच्याही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्वतच महाल भागातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी नगरसेवक श्री. मनोज साबळे यांच्यासह इतर उपस्थित होते. तसेच सीए रोडवरील चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्यालाही उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.
मनपा मुख्यालयातील छोटेखानी समारंभात मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. अनिल गेडाम, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, श्री. प्रवीण वानखेडे यांनीही पुष्पांजली अर्पण केली.