जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची ई- केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करा : आयुक्त डॉ. विपीन
मनपाची विशेष ई- केव्हायसी मोहीम १ ऑगस्टपासून १ ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष ई- केव्हायसी सेवा पंधरवडा
Date : 23 Jul 2026
पीएमजेएवाय कार्डचे ई- केव्हायसी करण्याचे काम आशा स्वयंसेविका, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC), शहरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रे (UHWC), रास्तभाव दुकानदार, CRC केंद्र चालक तसेच पोर्टल आयडीधारक लाभार्थी यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेत आपले E-KYC लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले आहे.
सध्या मनपा क्षेत्रात ३,१४,२०० पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डांचे वितरण पूर्ण झाले असून, शहरात १,१५७ आशा स्वयंसेविका PMJAY अंतर्गत E-KYC प्रक्रियेसाठी कार्यरत आहेत. दि. १ डिसेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून २,६८,५७५ लाभार्थ्यांची E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय, अन्न व नागरी पुरवठा विभाग, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC), शहरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रे (UHWC) तसेच इतर अधिकृत केंद्रांच्या माध्यमातून आयुष्मान कार्डांचे वितरण आणि E-KYC प्रक्रिया सुरू असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत या सुविधांचा लाभ पोहोचविण्यासाठी दि. १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विशेष E-KYC मोहीम राबविण्यात येणार आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांना १,२५६ प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया शासकीय तसेच मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ₹५ लाखांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते. तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ₹५ लाखांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (IGGMC) तसेच शहरातील ४३ मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये 'आरोग्य मित्र' यांच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लाभार्थी Ayushman App किंवा https://beneficiary.nha.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्मान कार्ड तयार करू शकतात. यासाठी आधार क्रमांक व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. E-KYC पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड व प्रिंट करू शकतात.
मनपा आरोग्य विभागाने सर्व पात्र नागरिकांना १ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विशेष E-KYC सेवा पंधरवड्यात सहभागी होऊन PMJAY कार्डचे E-KYC पूर्ण करावे आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. " >
यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना "विशेष मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे ई- केव्हायसी पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचून समन्वयाने ई- केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर द्यावा," असे निर्देश दिले.
बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकित, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, PMJAY समन्वयक डॉ. नगरकर, श्री. चौहान, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे समन्वयक श्री. बावनकुळे, सीआरसी केंद्राचे समन्वयक श्री. वट्टे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पीएमजेएवाय कार्डचे ई- केव्हायसी करण्याचे काम आशा स्वयंसेविका, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC), शहरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रे (UHWC), रास्तभाव दुकानदार, CRC केंद्र चालक तसेच पोर्टल आयडीधारक लाभार्थी यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेत आपले E-KYC लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले आहे.
सध्या मनपा क्षेत्रात ३,१४,२०० पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डांचे वितरण पूर्ण झाले असून, शहरात १,१५७ आशा स्वयंसेविका PMJAY अंतर्गत E-KYC प्रक्रियेसाठी कार्यरत आहेत. दि. १ डिसेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून २,६८,५७५ लाभार्थ्यांची E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय, अन्न व नागरी पुरवठा विभाग, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC), शहरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रे (UHWC) तसेच इतर अधिकृत केंद्रांच्या माध्यमातून आयुष्मान कार्डांचे वितरण आणि E-KYC प्रक्रिया सुरू असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत या सुविधांचा लाभ पोहोचविण्यासाठी दि. १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विशेष E-KYC मोहीम राबविण्यात येणार आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांना १,२५६ प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया शासकीय तसेच मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ₹५ लाखांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते. तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ₹५ लाखांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (IGGMC) तसेच शहरातील ४३ मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये 'आरोग्य मित्र' यांच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लाभार्थी Ayushman App किंवा https://beneficiary.nha.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्मान कार्ड तयार करू शकतात. यासाठी आधार क्रमांक व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. E-KYC पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड व प्रिंट करू शकतात.
मनपा आरोग्य विभागाने सर्व पात्र नागरिकांना १ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विशेष E-KYC सेवा पंधरवड्यात सहभागी होऊन PMJAY कार्डचे E-KYC पूर्ण करावे आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.