बचाव कार्यासाठी मनपा प्रशासन २४ तास सज्ज
सखल भागातील नागरिकांनी सावध राहावे महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे आवाहन
Date : 28 Jul 2026
मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागातर्फे बचाव कार्य करून विविध भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी तसेच मनपाच्या झोनल स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी 24 तास सजग राहावे, असे निर्देशही महापौरांनी दिले आहेत. महापौर श्रीमती निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांनी शहरातील अनेक भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली व यावेळी प्रशासनाला खबरदारी बाळगत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नदी व नाल्याच्या काठावर वस्ती असलेल्या नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाला वस्त्यांमध्ये पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. या माहितीच्या आधारावर तात्काळपणे बचाव कार्य सुरू केले जात असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी श्री. दिलीप चव्हाण यांनी दिली.
महापौरांनी अतिवृष्टी सदृश परिस्थिती लक्षात घेत शहरातील सर्व नगरसेवकांना आपआपल्या प्रभागांमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी सजग व तत्पर राहण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शाळांना बुधवार २९ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने नागपुरात येलो अलर्टचा इशारा दिला आहे. नागपुरात 28 जुलै ते 31 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.आज दुपारी केवळ तीन तासामध्ये शहरात मुसळधार पाऊस कोसळला. पुढील काही दिवस हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ही शक्यता लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिका अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागाने स्थितीचा आढावा घेतला. शहरात काही भागात पाणी साचल्याने तेथील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शहरातील सर्व झोनच्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी नरसाळा, हुडकेश्वरसह शहरातील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. याशिवाय उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम., मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार यांच्यासह झोनचे सर्व सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांनी देखील प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेट देत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले
खामला भागातील सोमलवार शाळेच्या आवारात तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने शाळेतील विद्यार्थांना मनपाच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी दोराच्या सहाय्याने अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचे बचाव कार्य यशस्वीपणे पार पाडले. यादरम्यान मनपाच्या स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे या प्रत्यक्ष उभ्या राहून अडकलेल्या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात मदत केली. यावेळी त्यांनी पालकांशी संवाद साधून व्यवस्थेची माहिती त्यांना दिली.
त्याचप्रमाणे नरेंद्रनगरातील एका शाळेत पाणी साचल्याची सूचना अग्निशमन विभागाला मिळाली. ही सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान तात्काळपणे तेथे पोहोचले व बचाव कार्य सुरू केले. अंबाझरी जैवविविधता पार्क येथे अडकलेल्या नागरिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले...
सीओसी द्वारे परिस्थितीवर नजर
मनपाच्या मुख्यालयात असलेल्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) 24 तास कार्यान्वित आहे. येथून शहरातील सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. तसेच बचाव पथकाला निर्देश दिले जात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते यांनी दिली. पाण्याची पातळी वाढल्यास किंवा आकस्मिक स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षातील 88560-23322 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे. नागपूर मनपाने प्रत्येक झोन कार्यालयामध्ये सुद्धा आकस्मिक सेवा देण्याची व्यवस्था केलेली आहे.
प्रत्येक झोनमधील मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष – 70309-72200
पोलीस नियंत्रण कक्ष – 0712-2561222
महावितरण – 1912
प्रमुख क्रमांक :
घनकचरा व्यवस्थापन विभाग : उपायुक्त श्री. राजेश भगत : 8275036200
मुख्य अग्निशमन अधिकारी : श्री. तुषार बाराहाते : 9594942171
मुख्य स्वच्छता अधिकारी : डॉ. गजेंद्र महल्ले: 7264822212
उद्यान विभाग : वृक्ष संवर्धक : श्री. अमोल चौरपगार : 9823391762
सहाय्यक आयुक्तांचे नाव व मोबाईल क्रमांक :
लक्ष्मीनगर झोन क्र.१ : श्री. धनंजय जाधव : 9823388333
धरमपेठ झोन क्र. २ : श्री. राजकुमार मेश्राम : 9923009462
हनुमान नगर झोन क्र. ३: श्री. नरेंद्र बावनकर : 9325543941
धंतोली झोन क्र. ४ : श्री. प्रमोद वानखेडे : 9850796978
नेहरु नगर झोन क्र. ५ : श्री. विकास रायबोले : 9850379410
गांधी महाल झोन क्र.६ : श्री. घनश्याम पंधरे : 8600363750
सतरंजीपुरा झोन क्र. ७ : श्री. हरीश राऊत : 9765559842
लकडगंज झोन क्र. ८ :श्री. विजय थुल : 9923797753
आशी नगर झोन क्र. ९ : श्री. गणेश राठोड : 9823128275
मंगळवारी झोन क्र. १० : श्री. अशोक गराटे : 9422301743