हुडकेश्वर-नरसाळा परिसराची महापौरांकडून पाहणी
नागरिकांशी साधला थेट संवाद
Date : 28 Jul 2026
महापौरांसोबत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, अग्निशमन विशेष समिती सभापती श्रीमती रुपाली ठाकूर, नगरसेवक श्री. मडावी तसेच सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान प्रामुख्याने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नाल्यावरील पुलावरील वाहत्या पाण्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीची सुरळीत व्यवस्था करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी महापौरांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे झालेले नुकसान आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती घेतली. नागरिकांनीही आपल्या समस्या महापौरांसमोर मांडत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.