नागपूर महानगरपालिका परिवहन विभागातर्फे नवीन शहरबस फीडर सेवेचे लोकार्पण
Date : 28 Jul 2026
नागपूर महानगरपालिका परिवहन विभागातर्फे उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन ते शाहूनगर (मनीषनगर मार्गे) या नवीन शहरबस फीडर सेवेचे लोकार्पण आज, दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता संपन्न झाले.
Back To Home Page
या सेवेचे लोकार्पण मा. सौ. मंगला खेकरे, सभापती (परिवहन), नागपूर महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. राजीव घाटोळे (व्यवस्थापक ऑपरेशन), श्री. गजानन नागूलवार ( व्यवस्थापक प्रशासन), श्री. महेश मोरोणे ( संयुक्त महाव्यस्थापक, MMI, महामेट्रो) तसेच श्री सुधाकर उराडे, महाव्यवस्थापक, ओ एंड एम “, चलो मोबिलिटीचे अधिकारी व परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
मेट्रो व शहरबस सेवेमध्ये प्रभावी समन्वय साधून नागरिकांना पर्यावरणपूरक, जलद, सुरक्षित व अखंड सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा या फीडर सेवेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होऊन सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला चालना मिळणार आहे.