स्व.प्रभाकरराव दटके डायग्नोस्टिक सेंटरचे लवकरच भूमिपूजन
Date : 29 Jul 2026
शहरातील नागरिकांना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्व. प्रभाकरराव दटके डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी केली जात आहे. यासाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, पार्किंगसह पाच मजली इमारत उभी केली जाणार आहे. यात ब्लड बँक, पॅथॉलॉजी, फिजिओथेरपीसह तत्सम रोगनिदान सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय रोगनिदान शिबीरे आयोजित करण्यासाठी सभागृह राहणार आहे. या सर्व सुविधा नागरिकांना अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहे.
एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा
या डायग्नोस्टिक सेंटरचा उपयोग या परिसरातील गरिबांना होईल. एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा लोकांना उपलब्ध करून देण्याचा हा एक लोकाभिमुख प्रयत्न असल्याचे आमदार श्री. प्रवीण दटके यांनी या बैठकीनंतर सांगितले.
दुसऱ्या टप्प्याचा आराखडा तयार करा : आयुक्त डॉ. विपीन
यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी या डायग्नोस्टिक सेंटरसाठी पहिल्या टप्प्यात दोन मजल्यासाठी इमारतीचा आराखडा मंजूर झालेला आहे. उर्वरित तीन मजल्यांसाठीचा दुसर्या टप्प्याचा आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी प्रशासनाला दिले.