मनपाच्या 50 गुणवंत स्वच्छता दुतांचा महापौरांच्या हस्ते सत्कार
शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये
Date : 31 Jul 2026
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे व 5 हजार रुपये रोख असे या सत्काराचे स्वरुप होते. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह प्रत्येक झोनचे स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.
सफाई कामगार शहर स्वच्छतेचा कणा- महापौर
यावेळी बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे म्हणाल्या, सफाई कर्मचारी म्हणून उत्कृष्ट काम करणार्या शहरातील 50 सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार हा त्यांच्या कामाची पावती आहे. हे तुमचे कार्य अभिनंदनीय आहे. तुमचे उत्कृष्ट काम हे इतरांसाठी प्रेरणा ठरणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका आहे. शहराच्या स्वच्छतेचा हा एक प्रकारे कणा आहे. आपण इतरांना सुद्धा चांगले काम करण्यासाठी प्रेरित करावे व यातून नागपूर शहर स्वच्छतेच्या कसोटीवर सर्वोत्कृष्ट करण्यासाठी आपण कटिबद्ध राहावे, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी केले.
प्रारंभी महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दीप प्रज्वलन केले. मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी महापौर श्रीमती ठाकरे, उपमहापौर श्रीमती हाथीबेड, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. प्रास्ताविक मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले. यावेळी त्यांनी हा दिवस दरवर्षी महानगरपालिकेत साजरा होत असल्याची माहिती दिली. उत्कृष्ट काम करण्याच्या निकषांवर गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून निवड केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन श्री. अरुण तुरके यांनी केले तर आभार श्री. प्रवीण तंत्रपाळे यांनी मानले.
शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त सत्कार करण्यात आलेल्या 50 गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांची झोननिहाय नावे पुढीलप्रमाणे.
झोन क्र १ लक्ष्मीनगर
श्री. अंबादास तुकाराम लोखंडे
श्री. अरुण विजाराम मेश्राम
श्री. दिलीप नामदेव उके
श्रीमती किरण अमरसिंग अरखेल
श्रीमती सुशीला रंजु बक्सरीया
झोन क्र २ धरमपेठ
श्रीमती गीता धारासिंग चावरीया
श्रीमती सुमित्रा मुन्ना महातो
श्री. राजकुमार आत्माराम मेश्राम
श्री. रायभान कवडू हिरेखान
श्री. रामराव पुंडलिक बालपांडे
झोन क्र ३ हनुमाननगर
श्री. सतिश नत्यु वायमार
श्री. शुंभम हरीरचंद्र मस्ते
श्रीमती गिता अशोक तुर्केल
श्री. किशार बुध्देलाल मात्रे
श्री. अरुण देवराव मेश्राम
झोन क्र ४ धंतोली
श्रीमती शिला अरुण परिहार
श्री. कैलास तुकडोजी रंगारी
श्री. महेन्द्र वंसत मोगरे
श्री. अनिल ईश्वर घरडे
श्री. अजय राजु डागोर
झोन क्र ५ नेहरुनगर
श्री. मनोज सूर्यभान रंगारी
श्रीमती रत्नगुंफा चंद्रमणी ढाकणे
श्रीमती शिला गुंडेराव श्रीरामे
श्रीमती कोमल मन्साराम खोब्रागडे
श्रीमती ललिता सुर्यभान मांडवकर
झोन क्रमांक ६ गांधीबाग
श्रीमती ज्योती राजा शेंद्रे
श्रीमती शिल्पा रुपचंद श्रीरामे
श्री. सचिन माधव लोखंडे
श्री. प्रविण भिवाजी मोटघरे
श्री. सुनिल होरीलाल बिरहा
झोन क्र ७ सतरंजीपुरा
श्री. छगन कवडू कांद्रीकर
श्री. रामदास बल्लु मखोरीया
श्रीमती संगिता दिलीप गौतेल
श्री. बंटो हेमचंद मलिक
श्री. विवेक हेमराज चौधरी
झोन क्र ८ लकडगंज
श्री. व्यंकटी माधव ठवरे
श्री. कमलाकर बाबुराव वंजारी
श्रीमती माया बैरीसाल
श्री. विजय भैयाजी जामगडे
श्री. राजकुमार सिताराम मेश्राम
झोन क्र ९ आशीनगर
श्रीमती सुनंदा उमेश मेश्राम
श्री. राजकुमार कवडुजी डोंगरे
श्री. राजेश दौलत पाटील
श्रीमती. नैना जांभुळकर
श्रीमती. अनिता वासे
झोन क्र १० मंगळवारी
श्री. संतोष फागो साठवणे
श्री. संजय मधुकर बहुते
श्री. बंडु राघोबा चिकणे
श्री. दिनेश ठवरे
श्री. रामकृष्ण अर्जुन बोरघरे