वृक्षारोपणाच्या महाअभियानाला प्रारंभ
मा. राज्यपालांच्या हस्ते लोकभवन येथे वृक्षारोपण
Date : 01 Aug 2026
सदर स्थित लोक भवन परिसरात माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्यासह कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर श्रीमती निता ठाकरे, राज्यसभा सदस्य खा. माया इवनाते आमदार श्री. मोहन मते, आ. श्री. प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, नासुप्र सभापती श्री. संजय मीना, मनपा आयुक्त डॉ. विपीन, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. एम. श्रीनिवास राव, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, मॉईलचे सीएमडी श्री. विश्वनाथ सुरेश, वेकोलीचे सीएमडी श्री. हेमंत पांडे, ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे यांच्यासह इतर मान्यवरांनी हस्ते वृक्षारोपण केले. अभियानांतर्गत लोकभवन परिसरात १० हजार वृक्षांचे वृक्षारोपण केले जाणार आहे.
नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासन, नागपूर जिल्हा परिषद, वन विभाग व ग्रीन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरासह जिल्ह्यात १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या अभियानांतर्गत शहरात ५ लक्ष व जिल्ह्यात ५ लक्ष असे एकूण १० लक्ष वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
याचाच शुभारंभ भागातील लोकभवनात येथे झाला. याप्रसंगी डीसीएफ नागपूर डॉ. विनिता व्यास, डॉ. भारतसिंह हाडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगनंथम एम, श्री. मिलिंद मेश्राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रवीण माहिरे, श्री. सुरेश बगळे, नगरसेविका श्रीमती दर्शनी धवड, मंगला खेकरे, लक्ष्मी यादव, दिव्या धुरडे, संतोषदेवी लढ्ढा, धनश्री देशपांडे, योगिता तेलंग, श्रीमती पूजा पाठक, नगरसेवक सर्वश्री. श्रीकांत आगलावे, विजय होले, अभिजीत झा, ग्रीन फाउंडेशनचे सचिव निशांत गांधी, मनपाचे उपायुक्त सर्वश्री. गणेश राठोड, अमोल चोरपगार, अधिकारी श्री. प्रशांत सोनकुसळे, संजय गुजर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर शहराला सुंदर व हरित साकारण्यासाठी प्रशासनाला विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे. वृक्षारोपणासाठी वन विभागाद्वारे ५ लाख वृक्ष दिले जाणार आहे. तर रायसोनी समूहातर्फे १ लाख वृक्ष दिले जाणार असून, पर्यावरण तज्ञ डॉ. चिंचमालतपुरे यांच्याकडून ५० हजार वृक्ष, व मॉईलचे आणि वेकोली यांच्या अर्थसहाय्य मिळणार आहे. नागरिकांनी देखील या महाअभियानात मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
अभियानांतर्गत या झाडांची होणार लागवड
लोक भवन परिसरात वड, उंबर, पिंपळ, बेल, चिंच, कडूनिंब, कदंब, खिरणी, बकुळ, कवठ, आवळा, महुआ, जांभूळ, आंबा, चिकू, अंजीर, अमलतास,बोर,,काटसावर, करंजी, पळस, जारूळ. आपटा, महारुख, शिरीष,सिसम, आजन, अर्जुन असे वृक्ष लावण्यात येणार आहे.