मनपातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन
Date : 01 Aug 2026
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे जयंती निमित्त दिक्षाभूमी चौक स्थित अण्णाभाऊ साठे यांचे अर्धकृती पुतळ्यास उपमहापौर लिला हाथीबेड यांनी माल्यापर्ण करून आदरांजली वाहिली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी तलाव स्थित लोकमान्य टिळक यांचे पुतळ्यास उपमहापौर लिला हाथीबेड यांनी माल्यापर्ण करण्यात आले. प्रसंगी माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी तसेच मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
Back To Home Page
मनपा सिव्हील कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेला दुर्बल घटक समितीच्या सभापती कु. लक्ष्मी हत्तीठेले यांनी माल्यापर्ण केले. प्रसंगी माजी नगरसेविका दुर्गा हत्तीठेले, विधी अधिकारी सुरज पारोचे, जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, प्रमोद बारई, शैलैश जांभुळकर, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे प्रकाश उकुंडे, सागर जाधव, महेंद्र पधान, बंटी इंगळे, सौ. कांचन राहुल बावणे, प्रविण डोंगरे, सोनु भोईमोर, सुनिल शिंदे व इतर समाज बांधव उपस्थिति होते.