मनपातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन
Date : 03 Aug 2026
भारतीय स्वातंत्र्य लढयात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग करुन ग्रामीण जनतेत स्वातंत्र्य मुल्य रुजविणारे क्रांतीकारक आणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
Back To Home Page
मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयापुढील दालनात सोमवार (ता.३ ऑगस्ट) रोजी उपायुक्त श्री. राजेश भगत यांनी क्रांतीसिंहाचे छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.