आपत्कालीन व आकस्मिक कामांना प्राधान्य द्या
दुर्बल घटक समितीच्या सभापती लक्ष्मी हत्तीठेले यांचे निर्देश
Date : 04 Aug 2026
दुर्बल घटक समितीची बैठक सभापती कु. लक्ष्मी हत्तीठेले यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 4) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, समितीचे सदस्य श्री. योगेश पाचपोर, श्रीमती सरस्वती सलामे, श्री. मनीष बनसोड, श्री. विवेक निकोसे, श्रीमती वर्षा डोंगरे, श्री. किरण मनपिया, श्री. तुषार लारोकर, कु. दुर्गेश्वरी कोसेकर उपस्थित होते.
या बैठकीत अध्यक्षांनी दुर्बल घटक समितीच्या अंतर्गत विविध भागांद्वारे शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. आधी मंजूर झालेले कामे व नवीन कामांच्या प्रस्तावांबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.
आधी सुचविलेले कामे पूर्ण करा: नरेंद्र (बाल्या) बोरकर
यावेळी बोलताना सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी नगरसेवकांनी या आधीच सुचविलेले व आमदारांनी सुचविलेल्या कामांची माहिती दुर्बल घटक समितीच्या सभापतींना द्यावी. यावर सभापती निर्णय घेतील. कोणत्याही कामांना सभापतींच्या मान्यतेशिवाय परस्पर मंजुरी देऊ नये, असेही निर्देश श्री. बोरकर यांनी दिले.
दुर्बल घटक समितीच्या अंतर्गत नगरसेवकांच्या आकस्मिक व आपात्कालिन कामांना मंजुरी देण्यात येईल. पावसाळा सुरू असल्याने या संदर्भात असलेली कामे मंजूर करण्यात येईल, असेही कु. लक्ष्मी हत्तीठेले यांनी सांगितले.