वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरसह शिष्टमंडळाने घेतली महापौरांची सदिच्छा भेट
शहरातील विविध विकासकामांसह भांडेवाडीतील प्रकल्पांची माहिती जाणून घेतली
Date : 05 Aug 2026
सदिच्छा भेटीदरम्यान मनपाच्या स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री मुरुगानंथम एम., वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर श्री. मार्शल लोपीस, स्थायी समिती सभापती श्री.प्रवीण शेट्टी, सभागृहनेते श्री. प्रफुल्ल साने, विरोधीपक्ष नेते श्री. मनोज पाटील, आरोग्य समिती सभापती श्री. निलेश देशमुख, गटनेता श्री.अशोक शेळके, श्री. नारायण मानकर, श्री. निशाद चोरघे, श्री. राजेश नाईक, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे, सहायक आयुक्त श्री. जितेंद्र नाईक, एआयआयएलएसजी सल्लागार श्री. श्रुतीसागर पाटील, कनिष्ठ अभियंता श्री. सचिन तांडेल, मनपाच्या आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत, श्री. विजय (पिंटू) झलके यांच्यासह उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या शहरातील विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर श्री. अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेत शिष्टमंडळ नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच महापौर श्री. अजीव पाटील यांनी शहरातील विकास कामांबद्दल मनपा प्रशासनाचे कौतुक केले. तसेच भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर असलेल्या भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्राला भेट देत प्रक्रियेचे संपूर्ण माहिती जाणून घेतली. पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जात असून, याबद्दल महापौर श्री. पाटील यांनी संपूर्ण माहिती जाणून घेत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाविषयी चर्चा केली.