दिव्यागांना नि:शुल्क जयपूर फूट साहित्य वाटप शिबीर ७ ऑगस्टपासून
१० ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत समारोप
Date : 06 Aug 2026
उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री श्री. अतुल सावे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री श्री. आशीष जयस्वाल यांच्यासह खासदार श्रीमती माया इवनाते, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार श्री. अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार श्री. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार श्री. संजय भेंडे, आमदार श्री. राजीव पोद्दार, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. समीर मेघे, आमदार श्री. चरणसिंग ठाकूर, आमदार डॉ. आशीष देशमुख, आमदार श्री. संजय मेश्राम, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम. मुख्यमंत्री सचिवालय, सहासचिव श्रीमती आशा पठाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर, धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, एमआयएमचे गटनेता शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेता श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या श्रीमती आभा पांडे, बसपाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जयस्वाल, शिवसेनेचे गटनेता श्री. गणेश चर्लेवार, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर उपस्थित राहणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांगजनांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी सद्यस्थितीत एकूण १४ महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. नागपूर शहरातील दिव्यांग व्यक्तीना महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून नागपूर शहरात निःशुल्क प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांगजनांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युडीआयडी कार्ड, आधार कार्ड शिबीर, संजय गांधी निराधार योजना नोंदणी शिबीर यांसारख्या उपक्रमांद्वारे दिव्यांगजनांना सुरक्षितता, आधार आणि सन्मानपूर्ण जीवनासाठी नागपूर महानगरपालिकेमार्फत आवश्यक पाठबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. मोठ्या संख्येत दिव्यांग बांधवानी शिबिरात येऊन लाभ घ्यावा असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम. यांनी केले आहे.