नामकरणाच्या प्रस्तावाबाबत लवकरात लवकर कारवाई करावी: उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड
उपमहापौर यांनी घेतला शहरातील चौक, रस्ते व उद्यानांच्या नामकरणासाठीचा आढावा
Date : 07 Aug 2026
मनपा मुख्यालयातील उपमहापौरांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत समिती सदस्य श्री. दीपक पटेल, श्री. चंद्रकांत खंगार यांच्यासह झोनचे सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, श्री. राजकुमार मेश्राम, श्री. नरेंद्र बावनकर, श्री. विजय थूल, श्री. प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे यांच्यासह झोनचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी नामकरणाच्या या प्रक्रियेला गती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या संबंधित समितीमार्फत शहरातील सर्व दहाही झोनकडे एकूण ४१ प्रस्ताव पाठवण्यात आले असल्याचे सांगितले. उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी नामकरणाच्या प्रलंबित प्रस्तावासंदर्भातील सर्व कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले.