दिव्यांगाच्या साहित्य वाटप शिबीरात महापौरांनी साधला लाभार्थ्यांशी हृदयस्पर्शी संवाद
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क साहित्य वाटप सोमवार १० रोजी
Date : 08 Aug 2026
याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विपीन, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर, मुख्यमंत्री सचिवालय येथील सहसचिव श्रीमती आशा पठाण, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्निल लोखंडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर व श्री. अभिजीत राऊत, यांच्यासह भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे श्री. नारायण व्यास, समन्वयक श्री. सुबोध भंडारी उपस्थित होते.
दिव्यांग, अंध, कर्णबधीरांना जयपूर फूट सह आवश्यक सहायक साहित्य देण्यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, नागपूर जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व टाटा ट्रस्टने संयुक्त विद्यमाने ७ ते १० ऑगस्ट दरम्यान शिबिर आयोजित केले आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह परिसरात आयोजित शिबिराला लाभार्थीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, सोमवार १० रोजी सकाळी ९ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याचे वाटप केले जाणार आहे. अशी माहिती महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिली.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले की, मनपाद्वारे शिबिरात येणाऱ्या दिव्यांग बांधवाना उत्तम सोयीसुविधा प्रदान केल्या जात आहेत. यावेळी एनसीसी, व एनएसएसचे स्वयंसेवक नागरिकांना सहकार्य करीत आहे. सदर शिबिराचे दिनांक ०७/०८/२०२६ रोजी उद्घाटन करण्यात आले. सदर शिबिरात दिव्यांग लाभार्थ्यांना ने-आण करण्याकरिता झोननिहाय महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिबिराला उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांकरिता तसेच सोबत येणाऱ्या मदतनीसांकरिता नाश्ता, चहा व मोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. सदर शिबिरात दिव्यांग लाभाथ्यांना UDID कार्ड, संजय गांधी निराधार योजनासह १७ प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात साहित्याचे नाव व संख्या पुढील प्रमाणे, :- 250 Artificial Limb-Leg, 30 Artificial Limb-Hand, 200 Calliper, 80 Axillary Crutch, 20 Elbow Cutch, 230 Walking Stick,100 Quadripod Stick, 300 Folding Walker, 20 Rollator 575, Wheel chair Adult/Child 145 C.P Wheel chair Adult/Child, 500, Hearing Aid BTE, 300
Hearing Aid V Cord, 100 Hearing Aid S Cord, 150 Blind Stick, 20 Shoe Raising , 100 L.S. Belt असे एकूण ३१२०
शिबिराला उपस्थित राहणाऱ्या लाभाथ्यांची ऑनलाईन संकेत स्थळाद्वारे नोंदणी करण्याकरिता १० नोंदणी कक्ष तयार करण्यात आले आहे. ज्या लाभाथ्यांची साहित्याकरिता अगोदर नोंदणी करण्यात आली नाही, अश्या नवीन लाभाथ्यांकरिता नोंदणी कक्ष तयार करण्यात आले असून, त्यांची नोंदणी करून त्यांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ७ ऑगस्ट रोजी शिबिराच्या प्रथम दिवशी ७६५ दिव्यांग लाभाथ्यांची नोंदणी करण्यात आली असून, ६६१ लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे साहित्य वाटप करण्यात आले आहे
· Artificial Limb- २८
· Caliper- ८५
· Axillary Crutch, Walker, Stick, L S Belt- १०४
. Wheelchair, CP Wheelchair- २०४
· Blind Stick- ५१
• Hearing Aids- २१०
Other Supportive Services :-
· CRC Nagpur- ९४
· UDID Certificate Registration- २४
· Sanjay Gandhi Niradhan Yojna Registration- ७४
दिव्यांग बांधवानी देखील मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे.
सोमवार १० रोजी समारोप
शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. या समारंभाला उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपरंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री श्री. अतुल सावे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री श्री. आशीष जयस्वाल यांच्यासह खासदार श्रीमती माया इवनाते, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार श्री. अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार श्री. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार श्री. संजय भेंडे, आमदार श्री. राजीव पोद्दार, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. समीर मेघे, आमदार श्री. चरणसिंग ठाकूर, आमदार डॉ. आशीष देशमुख, आमदार श्री. संजय मेश्राम, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम. मुख्यमंत्री सचिवालय, सहासचिव श्रीमती आशा पठाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर, धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, एमआयएमचे गटनेता शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेता श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या श्रीमती आभा पांडे, बसपाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जयस्वाल, शिवसेनेचे गटनेता श्री. गणेश चर्लेवार, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर उपस्थित राहणार आहेत.