अनधिकृत बांधकाम वापर करणाऱ्या धोकादायक आस्थापनांवर समन्वयाने कारवाई करा
महापौर निता ठाकरे यांचे बैठकीत निर्देश
Date : 08 Aug 2026
नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामे, मंजूर बांधकाम नकाशाविना करण्यात आलेले बांधकाम, अनधिकृत वापरबदल, अग्निसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आस्थापना तसेच अतिक्रमण याबाबत संबंधित विभागांच्या समन्वयाने प्रभावी कार्यवाही करण्यासाठी शनिवारी (ता.८) महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर स्थापत्य व बांधकाम विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती श्रीमती रूपाली ठाकूर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. मंगेश खवले, नगररचना विभाग, संबंधित झोनचे सहायक आयुक्त, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री राजेंद्र उचके, विभागीय अग्निशमन अधिकारी व सर्व केंद्र अधिकारी, अग्निशमन विभाग तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापौर निता ठाकरे यांनी प्रत्येक झोनमध्ये किमान १० प्रकरणे निश्चित करून त्यावर संयुक्त कार्यवाही करणे, नगररचना विभागाकडून मंजूर बांधकामांची झोननिहाय माहिती घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करणे आणि गंभीर उल्लंघनांवर कोणतीही तडजोड न करता कायद्यानुसार कठोर कार्यवाही करणे, बाबत प्रमुख निर्देश दिले.