मनपात भूसंपादन कक्ष स्थापन करण्याचे महापौरांचे निर्देश
Date : 13 Aug 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी भूसंपादनाशी निगडित विविध विषयांवर चर्चा करताना शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच भूसंपादनासंदर्भात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी मनपात भूसंपादन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. तसेच यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा अशा ही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर,स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, नगरसेवक श्री. विजय झलके, उपायुक्त श्री. निर्भय जैन, नगररचना विभागाचे सहसंचालक श्री. ऋतुराज जाधव, विधी अधिकारी श्री. सुरज पारोचे, उपविभागीय अधिकारी श्री. सचिन कुमावत, उपजिल्हाधिकारी श्री. गणेश मरकड, नायब तहसीलदार श्री. राजेश देडे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, श्री. तुषार बाराहाते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच बैठकीत भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्यूपन्सी सर्टिफिकेट) संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भोगवाटा प्रमाणपत्रासंदर्भात समितीमार्फत सुरुवातीला १०० मालमत्ता यांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशा सूचना देखील महापौर यांनी दिले.