मनपा मुख्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सर्व सामान्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप
Date : 14 Aug 2026
तत्पूर्वी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कस्तुरचंद पार्क येथे आयोजित फाळणी भयावहता स्मृती दिन कार्यक्रमाच्या मध्यामातून विभाजन विभिषिकेच्या भयावह स्मृतींची माहिती देण्यात आली. माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी उपस्थितांना भयावह स्मृतींची माहिती दिली. यावेळी मनपाच्या स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ध्वज फडकवून भारताच्या फाळणीदरम्यान प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य निर्दोष नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फाळणीच्या काळातील अमानुष अत्याचार, विस्थापन आणि असंख्य कुटुंबांच्या दुःखद आठवणींचे स्मरण करत, राष्ट्राची अखंडता, एकता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.